बोर्ड परीक्षा आता बंद होणार? जाणून घ्या व्हायरल मेसेज मागचं सत्य!

सोशल मीडियावर सध्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीचा एक मॅसेज व्हायरल होत आहे, ज्यात दहावीची बोर्ड परीक्षा बंद होणार अशी अफवा सर्वत्र पसरत आहे मात्र अजून मॅसेजमध्ये काय आहे ते पहा. सरकारने असं कोणतंही धोरण राबवलेलं नाही. विद्यार्थ्यांबद्दलच नव्हे तर कोणतेही निर्णय बदलले तर सरकार आधी माहिती देते,त्यामुळं आमच्या पडताळणीत दहावीची बोर्ड परीक्षा आता बंद होणार असल्याचा दावा असत्य ठरला.